अमरावती विभागाच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे.
उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती ह्या विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणे, शालेय क्रीडा स्पर्धांचा आयोजन, तसेच क्रीडा आणि युवकांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवणे समाविष्ट आहे.
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने कीडा संस्कृतीचे संर्वधन, प्रचार, प्रसार, जोपासना आणि प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण जाहिर करणारे देशातील पहिले राज्य ठरते आहे. राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच आरोग्य व व्यायाम याबाबत नागरिकांमध्ये आवड जोपासण्यासाठी खेळाडुचे हित लक्षात घेवून क्रीडा धोरण जाहिर करण्यात आले आहे. खेळाडू हा केंद्रबिंदु माणुन राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, दर्जेदार क्रीडा सुविधा, इत्यादी खेळाडूच्या हिताच्या शिफारसी उपयोजना शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. आज प्रत्येक खेळात तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता यावर भर देण्यात येत आहे. भारतीय देशी खेळ तसेच विदेशी खेळासोबतव साहसी क्रीडा स्पर्धा उपक्रम याव्दारे सुध्दा क्रीडा संस्कृती समृध्द करुन क्रीडा क्षेत्राता गती देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकीक करील असा मला विश्वास आहे. शुभेच्छासह...